• मुख्य पान
  संस्थेविषयी
  संचालक व पदाधिकारी
  उपक्रम
  सभागृह
  फोटोगॅलरी
  प्रतिक्रिया
  संपर्क
  वैश्यविजय
  आर्थिक ताळेबंद व पंचवार्षिक अहवाल
   
  वधूवर सूची
   
  घडामोडी व आगामी उपक्रम

  Sanstha registered 45263 u/s.12AA(1)(b)(i) w.e.f 01/04/2011.
   

  Please Click Here (GR Copy)

  वैश्य विजय एप्रिल २०१९

   
   
  भावपूर्ण आदरांजली
  पु.कॄ. तथा
  आप्पा शेट्ये
  यांना
  भावपूर्ण श्रद्धांजली
   
  उपक्रम
  • संस्थेतर्फे अनाथ, अपंग व निराधार महिलाना दरमहा नियमित आर्थिक मदत केलीजाते.
  • संस्थेच्या युवक समिती द्वारे दरवर्षी वार्षिक क्रीडा मोहोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विविध बैठे व मैदानी खेळ यांच्याद्वारे समाज बांधवांच्या क्रीडागुणांना उत्तेजन दिले जाते. युवकांचा निसर्ग भ्रमण व वर्षा सहलीचे आयोजन करण्यात येते.
  • कला मनोरंजन समितीद्वारे  समाज - बंधु भगिनींच्या कलागुणांना उत्तेजन देण्याकरीता - एकांकिका स्पर्धा, नाट्य प्रशिक्षण शिबीर, इत्यादी सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.  
  • वधु - वर सूचक  समितीद्वारे  उपवर वधु - वरांना मार्गदर्शन करण्यासाठी दररोज सांयकाळी संस्थेचे जेष्ठ कार्यकर्ते कार्यालयात कार्यरत असतात. दरवर्षी भव्य वधु - वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात येतो. अल्प खर्चात गरीब समाज बांधवांचे विवाह सोहळे पार पाडण्यात येतात.
  • महिला समितीद्वारे महिलांच्या कलागुणांना उत्तेजन देणारे कार्यक्रम रबविले जातात. आनंद मेळाव्याचे आयोजन करुन महिलांद्वारा उत्पादित वस्तुंच्या विक्रीची व्यवस्था केली जाते.
  • शिक्षण समितीमार्फत दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके, रौप्य पदके व रोख परितोषिके देऊन गौरविण्यात येते. हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता विविध शिष्यवृत्या व आर्थिक मदत दिली जाते. उच्च शिक्षणाअसाठी परदेशी जाणाऱ्या  गरजू विद्यार्थ्यांना ‘श्री गणेश शिष्यवृत्ती फंडातून’ परत फेडीच्या अटीवर आर्थिक मदत केली जाते. विद्यार्थ्यांकरीता व्यवसाय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले जाते.          
  • वैद्यकीय सहाय्य निधीतून समाजातील गंभीर आजार असलेल्या गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेकरीता व वैद्यकीय उपचारांकरीता आर्थिक मदत केली जाते. आरोग्य, रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबीरांचे आयोजन करण्यात येते.
  • ‘वैश्य विजय’ मासिक दरमहा प्रकाशित करण्यात येते. समज बंधु - भगिनींच्या विविधांगी गुणवत्तेला पसिद्धी देण्यात येते. समाज संपर्काचे उत्कृष्ट माध्यम.