• दूरध्वनी : ०२२-२३८२ ७७ ७३ / २३८१८ ८८ ६४
  • ईमेल : info@ksvaishyasamaj.org

कोंकणस्थ (सं.) वैश्य समाज, मुंबई

६, शेणवी वाडी, नवाकाळ पथ, गिरगांव, मुंबई - ४०० ००४

विविध समित्या

वधुवर समिती

वधु-वर सूचक समितीद्वारे उपवर वधु-वरांना मार्गदर्शनासाठी दररोज सायंकाळी संस्थेचे ज्येष्ट कार्यकर्ते कार्यालयात कार्यरत असतात. दरवर्षी भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा आजोजित करण्यात येतो. अल्प खर्चात गरीब समाज बांधवांचे विवाह सोहळे पार पाडण्यात येतात.

शिक्षण समिती

शिक्षण समितीमार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके, रौप्य पदके व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येते. हुशार, होतकरु व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता विविध शिष्यवृत्या व आर्थिक मदत दिली जाते. उच्च शिक्षणासाठी परदेशी जात असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना 'श्री गणेश शिष्यवॄत्ती फंडातून' परत फेडीच्या अटीवर आर्थिक मदत केली जाते. विद्यार्थ्यांकरीता व्यवसाय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येते.

वैद्यकिय समिती

वैद्यकिय सहाय्य निधीतून समाजातील गंभीर आजार असलेल्या गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेकरीता व वैद्यकीय उपचारांकरीता आर्थिक मदत केली जाते. आरोग्य, रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबीरांचे आयोजन करण्यात येते.

कला मनोरंजन समिती

कला मनोरंजन समितीद्वारे समाज-बंधु भगिनींच्या कलागुणांना उत्तेजन देण्याकरीता एकांकिका स्पर्धा, नाट्य प्रशिक्षण शिबीर इत्यादी सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

युवक संघटना

संस्थेच्या युवक समितीद्वारे दरवर्षी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विविध बैठे खेळ व मैदानी खेळ यांच्याद्वारे समाज बांधवांच्या क्रीडागुणांना उत्तेजन दिले जाते. युवकांच्या निसर्ग भ्रमण व वर्षा सहलीचे आयोजन केले जाते.

महिला समिती

महिला समितीद्वारे महिलांच्या कलागुणांना उत्तेजन देणारे कार्यक्रम राबविले जातात. आनंद मेळाव्याचे आयोजन करुन महिलांद्वारा उत्पादित वस्तुंच्या विक्रीची व्यवस्था केली जाते. महिलांचे विविध कार्यक्रम नियमित आयोजित करण्यात येतात.

अनाथ पंगू निधी

संस्थेतर्फे अनाथ, अपंग व निराधार महिलांना दरमहा नियमित आर्थिक मदत केली जाते.

भावपूर्ण आदरांजली

पु.कॄ. तथा आप्पा शेट्ये यांना भावपूर्ण श्रद्धांजली

घडामोडी व आगामी उपक्रम

  • वेबसाईट नवीन स्वरूपात

वैश्यविजय

समाज संपर्काचे उत्कॄष्ट माध्यम तसेच समाज बंधु-भगिनींच्या विविधांगी गुणवत्तेला प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने 'वैश्य विजय' मासिक दरमहा नियमित प्रकाशित करण्यात येते.